श्रीगुरुचरित्राची आरती
आरती गाऊ श्रीगुरुचरित्रा ।।ध्रु।।
ग्रंथ प्रासादिक लेखन मार्मिक,
मार्गाचा दर्शक भक्ताचा रक्षक,
अनंत अपार ज्ञानाच्या सत्रा ।।१।।
बोलका संवाद मना दे आल्हाद,
वाणीचा प्रसाद धादांत वेदांत,
गंगेच्या जलौघा परमपवित्रा ।।२।।
कथांची गुंफण चित्रांचे दर्शन,
सत्याचे मंडन पाखंड खंडन,
प्रत्येक अक्षर स्फुरवी मंत्रा ।।३।।
गाणगापुरात नरसोबावाडीत,
भिलवडी येथील औदुंबर क्षेत्रात,
निवास आपला अत्रिंच्या पुत्रा ।।४।।
शुचिता चिंतनी शुचिता वचनी,
शुचिता वर्तनी शुचिता स्पर्शनी,
सखोल चिंतन श्रीरामा अंगारा ।।५।।
सुयोग, फार सुंदर कविता! गुरुचरित्र व त्यातील महत्वाची स्थाने याचे संक्षिप्त वर्णन छान!
ReplyDeleteनिलिमा
सुयोग, फार सुंदर कविता! गुरुचरित्र व त्यातील महत्वाची स्थाने याचे संक्षिप्त वर्णन छान!
ReplyDeleteनिलिमा
सुयोग, फार सुंदर कविता!! गुरुचरित्र व त्यातील महत्वाची स्थाने संक्षिप्त वर्णन छान!!
ReplyDeleteनिलिमा
This comment has been removed by the author.
ReplyDelete