३९. सुफल लाभले सेवेला.
साठ वर्षांच्या गंगा या स्त्रीला मूलबाळ होत नव्हते. सोमनाथ या पतीबरोबर ती गुरुसेवेस येई. तू निरांजन आणतेस, पूजेला ओवाळतेस. काय हवे तुला? नारायण आणि गौरीनाथ शंकर गुरुप्रसाद देतील. संभाषणाच्या ओघात श्रीगुरु म्हणाले, अश्वत्थसेवा कर. पिंपळाच्या झाडाला नकोस दोष देऊ। गुरुवाक्य म्हणजे कामधेनु समजून आराधना घडली. ती प्रसूत होऊन कन्यारत्न झाले आणि गुरुकृपाप्रसादे पुत्रही झाला.
बाळक आणेनि भक्तींसी । ठेविलें श्रीगुरुचरणांशी।
नमन करीत साष्टांगेसी एक भावे करुनिया ।।४८।। अध्याय ३९ ।।
अपार महिमा ज्याचा तुझिया कानी नच आला
उताविळपणे नकोस निंदू पिंपळ वृक्षाला।।ध्रु.।।
चूक आपली असून माणूस बोल लावते नशिबाला
देहदु:ख वा मनोभंग हा योग्यच फळ ते कर्माला
श्रीगुरु भेटत, ना विश्वासत - अंत न तर प्रारब्धाला ।।१ ।।
संगमावरी तीरावरती पिंपळ मोठा असे पहा
सर्व देव त्या ठायी वसती, तिथे चाललो नीट पहा
त्याची सेवा तनुमनुजीवे तूच करावी वदत तुला।।२।।
गाणगापुरला श्रीगुरु असती, सात प्रदक्षिणा त्यांना घाल
भक्तिभावना धरून अंतरी लोटांगण त्यांना घाल
दोन फळे कर मोदे सेवन शपथ शपथ होशी अमला।।3।।
गुरुप्रसादे प्रौढ असूनही गर्भधारणा तिज झाली
निपजे कन्या उदरी तिचिया त्यांच्या चरणी ती घाली
पुत्र नसे तरी सरस्वती घरी आली ना बोलवे तिला।।४।।
अभागिनी जी वृद्धा समजे पुढे तिला मुलगा झाला
वेदशास्त्र संपादन केले मोजमाप ना कीर्तीला
हरिरुपे अश्वत्थच असतो श्रद्धाभाव हवा जपला।।५।।
वनवैभव हे जतन करावे खचित संपते प्रदूषण
यत्नाला ना कधी चुकावे टाळण्यास अपुले मरण
अस्तित्त्वाचा अनुभव ऐसा सुफल लाभले सेवेला।।६।।
Friday, March 5, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment