४३. व्रत जे घ्यावे, पाळावे ते.
या अध्यायात सायंदेवाला श्रीगुरुंनी अनंत व्रताचे महात्म्य सांगितले. श्रीकृष्णाने वनवासात युधिष्ठिराला हेच व्रत सांगितले. कौंडिण्य ऋषींची पत्नी सुशीला हिला या व्रताची महती कळली. पण तिने हातात बांधलेला अनंत (हा धागा) कौंडिण्याने आगीत टाकला. पण त्याला दारिद्र्य आले. अनंताचे दर्शन घेतल्याविन अन्न घेणार नाही म्हणत अरण्यात भटकला असता त्याला अनंताने दर्शन दिले. पश्चात्तापाने कौंडिण्याची चित्तशुद्धी झाली. देवाची कृपा झाली.
इतुकिया अवसरी । वृद्ध ब्राह्मण वेषधारी।
जवळी झाला परिकरी । उठी उठी म्हणसे ।।१२८।। अध्याय ४३
युधिष्ठिरा व्रत वनवासी कथितो,
अनंत त्याचे नाव ।।ध्रु।।।
गेले वैभव पुन्हा लाभते,
स्वार्थ जिंकला जणु परमार्थे,
अनंत माझे नाव ।।१।।
भा्द्रपदाची शुक्ल चतुर्दशी,
पाळावे व्रत त्या शुभदिवशी,
पैल लागते नाव ।।२।।
सुमंत पत्नी दीक्षा गेली,
सुता सुशीला मात्र राहिली,
उत्कट ठरला भाव ।।३।।
कौंडिण्याची झाली पत्नी,
तीही गेली पतीमागुनी,
श्रीहरि घेई धाव ।।४।।
अनुतापे कोंडिण्य पोळला,
अनंत शोधा वनी भटकला,
स्वस्वरुपी घे ठाव ।।५।।
व्रत जे घ्यावे पाळावे ते,
कडवेपण मग तनिमनि येते,
उजळतसे तर नाव ।।६।।
Sunday, April 25, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment