४७ . श्रीगुरु सात ठायी गेले
गाणगापुरात असताना दिवाळीचा सण आला। वेगवेगळ्या गावात राहणार्या सात शिष्यांनी आपल्याच घरी भिक्षेला येण्याचा आग्रह धरला. स्वामी तुम्ही कुणालाही निराश करू नये जे सांगाल ते आम्ही करू. साती जणांची मी तुझ्याच घरी येतो अशी समजूत घालून त्यांना आपापल्या घरी पाठविले. आम्ही इथेच राहणार आहो असे गाणगापुरात म्हटले. श्रीगुरुंनी आठ रुपे घेतली व साती शिष्यांकडे पूजेला गेले. तरी पण वाडीत ते होतेच.
आठ रुपे झाले आपण । अपार महिमा नारायण ।
सात ठायीही गेले आपण। गाणगापुरी होतेची ।।२६।। अध्याय ४७।।
गाणगापुरी असुनि आपण आठरुप जाहले,
श्रीगुरु सात ठायी गेले ।।ध्रु।।।
प्रत्येकाचा गाव वेगळा,
प्रत्येकाचा हट्ट आगळा,
सर्वांच्या घरी कैसे येणे?
कुणी न हे जाणले ।।१।।
उच्च नीच ना भेद पाहिला,
जवळ दूरचा भेद न केला,
मायमाउली सगळ्यांचे गुरु,
प्रतिघरी ते जेवले ।।२।।
गाणगापुरा नाही त्यजिले,
आनंदरुपे भरले उरले,
मायेला सीमा न आईच्या,
सजल जलद वर्षले ।।३।।
गावोगावी अशी दिवाळी,
गाणगापुरी तरी दिवाळी,
आलो होतो प्रतिसदनी मी
ध्यानी आणुन दिले ।।४।।
सिद्धेशाला वश सिद्धी ही
ॐ गुरु ऐसी साक्ष प्रत्यही,
नवलाईची नवलकथाही,
स्मरता मन हलले ।।५।।
Wednesday, April 28, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment