५०. व्याधी बरी करावी स्वामी.
तो धोबी पुन्हा जन्मला आणि बिदरचा बादशाह झाला. पण रजकाच्या जन्माच्या आधीचे भोग भोगायचे राहून गेले होते. बादशहाच्या मांडीवर फोड आला. ते दुखणे बरे होईना. या जन्मी नदीतीरीच स्वामी भेटले। यवन बादश्ाहा कळवळून म्हणाला
चतुश्चत्वारिशतं कोश देखा। राजा पातला दिवसें एका ।
पापविनाशी तीर्थी निका । अवलोकीतसे श्रीगुरुसी ।।२२७।। अध्याय ५०
व्याधी बरी करावी स्वामी, व्याधी बरी करावी ।।ध्रु।।।
गतजन्मीचा धोबी होतो,
या जन्मीचा राजा होतो,
माया नरा वाचवी ।।१।।
मांडीवर परि फोडच आला,
दु:ख असे कुणी टोचत भाला,
युक्ती काय करावी ? ।।२।।
म्लेंच्छ मी परि द्वेष न ठावा,
खुदा मला सर्वत्र दिसावा,
वाट दाखवा बरवी ।।३।।
संगमावरी भेट जाहली,
आस दुजी ना कसली उरली,
कुडी कृपांकित व्हावी ।।४।।
लागे हुरहुर सुखही वाटे,
फुले जाहली पथि जे काटे,
किमया कशी कळावी ? ।।५।।
No comments:
Post a Comment