४४. श्री शैलपर्वती नेले
श्रीगुरुंच्या अनेक भक्तांत एक विणकरही होता। तो तिसर्या प्रहरी मठाचे आंगण झाडत असे। दुरून नमस्कार करीत असे. शिवरात्रीला त्याचे मातापिता यात्रेला निघाले. तेव्हा त्यांच्याबरोबर तो गेला नाही. श्रीशैल पर्वताचे दर्शन घडविण्याचा चमत्कार श्रीगुरुंनी घडविला. मनोवेग उपयोगी पडला. पण गुरुंनी त्याला सांगितले सर्व चराचर जरी इश्वरानेच व्यापलेले असले तरी विशिष्ट स्थानाचे महात्म्य हे असतेच।
क्षणैक मात्र निद्रावस्था । म्हणता झाला जागृत ।
अवलोकिता पर्वत दिसत । म्हणे स्वप्न किंवा सत्य ।।१९।। अध्याय ४४ ।।
मी साधा विणकर भक्त, श्रीगुरुचरणी आसक्त,
ना दुसरे काही रुचत, गुरुदेवा घ्यावी सेवा ।।१।।
तुम्ही श्रीशिवशंकर माझे, अंतरात मूर्ति विराजे,
पदविरह न मज सहवत, मन सुमन करा ते साजे ।।२।।
गुरुचरणी सगळ्या यात्रा, दृढभाव प्रभावी मात्रा,
उतराया कठिण कसोटी, पुरवा बळ चित्ता गात्रा ।।३।।
मग अघटित काही घडले, श्रीशैलपर्वती नेले,
शिवरुप सद्गुरु बघता, ज्ञानाचे नयन उघडले ।।४।।
तुज बाळा सांगत आहे, स्थानाचा महिमा पाहे,
अज्ञान असे तव गेले, गुरुकृपेस सीमा नोहे, शिवकृपेस अंतच नोहे ।।५।।
No comments:
Post a Comment