४१. कठिण, कठिण, श्रीगुरुसेवा
नामधारक शिष्याने सिद्धमुनींना वंदन करून विचारले, स्वामी, माझ्या पूर्वजांनी श्रीगुरुंची सेवा कशी केली होती? नामधारकाचे पूर्वज सायंदेव। सायंदेवाची परीक्षा श्रीगुरुंनी पाहिली. तेव्हा तर वाटले गुरुसेवा अत्यंत कठिण आहे. तात्पर्य - गुरुसेवा फार विचार करून स्वीकारावी. मृत्यूचीही भिती बाळगता कामा नये.
पाच फडेचे दिसती दोनी । सेवेंचि येताति धांवोनि ।
विप्र भ्याला आपुले मनीं । धावतसे भिऊनिया ।। ७४ ।। अध्याय ४१ ।।
कठिण कठिण श्रीगुरुसेवा,
भयशंका नच मनि ठेवा ।।ध्रु।।।
सोसाट्याचे येवो वादळ,
पाऊस घालो सुखे धुमाकुळ,
तोंड द्यावया धरी हवा।।१।।
श्रीगुरु धैर्यपरिक्षा घेती,
घालवती मृत्यूची भीती,
संजीवन लाभते जीवा।।२।।
गुर्वाज्ञेचे पालन करता,
अटी घालती ध्यानी घेता,
द्वंद्वाचा लोटतो थवा ।।३।।
सर्पहि रक्षणकर्ते होती,
वाघाचीही कसली भीती,
चेला तर निधडाच हवा ।।४।।
तीर्थांची देहातच वसती,
प्रवासास का जन धडपडती,
विश्वेश्वर चित्तात हवा ।।५।।
Wednesday, April 21, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment